फलटण : नवरात्रोत्सवाचा उत्साह व गरबा-दांडियाचा जल्लोषअनुभवण्यासाठी फलटणकरांना एक खास पर्वणी मिळणार आहे. राजे कल्चरल ग्रुप, फलटण, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘दांडिया धमाल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ठिक ५ वाजता मुधोजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज, फलटण येथे करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता मुधोजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज, फलटण येथे होणार आहे. नवरात्र गरबा आणि दांडिया डान्स परफॉर्मन्समुळे या कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तालावर थिरकणारी पावले, २० वर्षांची ध्यासा आणि २१व्या वर्षातही गाजणारा दांडिया रास! अशी संकल्पना आयोजकांनी मांडली आहे. गरबा-दांडियाच्या माध्यमातून नृत्यकला, उत्सवाचा आनंद आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमाच्या फूड स्टॉलसाठी तसेच अन्य माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ८४०८०६३७३७, ८४२२४०५९९९ ७०५८१५५१५५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.